मंत्र्यांची वेळ बदलाची घोषणा परंतु आदिवासी विद्यार्थी नवीन वेळेच्या प्रतीक्षेतच फाईल चित्र जळगाव प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) ...
मंत्र्यांची वेळ बदलाची घोषणा परंतु आदिवासी विद्यार्थी नवीन वेळेच्या प्रतीक्षेतच
![]() |
| फाईल चित्र |
जळगाव प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
सुमारे दीड वर्षापासून वादातीत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांच्या वेळापत्रका बद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभेत बऱ्याच वेळा चर्चा झाल्या. सध्याची वेळ अन्यायकारक असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.असे असतानाच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आपण गैरसोय दूर करू म्हणत आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी दोन वेळा घोषणा करूनही वेळात बदल होत नाही.या आधी त्यांनी सांगितल्या प्रमाणे २६ जानेवारी पासून आणि नंतर १ फेब्रुवारी पासून शाळा ह्या ११ ते ५ या नवीन वेळेत भरण्याची घोषणा केली होती.परंतु आजतागायत आदिवासी विद्यार्थ्यांना वेळ बदलाची अजून प्रतीक्षाच आहे.वेळ बदलाच्या विषया संदर्भात शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेकडून देखील बराच वेळा पाठपुरावा करण्यात आलेला आहे.शाळेची वेळ बदलावी यासाठी अनेक शिक्षक आमदारांनी देखील पाठपुरावा केला आहे.आदिवासी मंत्र्यांची वेळ बदलाबाबत सोशल मीडिया वरील व्हिडिओ देखील बरेच व्हायरल झालेत.असे असताना दुसरीकडे मात्र वेळ बदलाचे पत्रच निघाले नसल्यामुळे शाळा अजून जुन्या वेळेतच भरत आहेत.एकूणच समन्वयाचा अभाव याबाबत दिसून येतो.या सर्व बाबींचा केंद्रबिंदू असलेले आदिवासी विद्यार्थी मात्र नवीन वेळाच्या प्रतीक्षेतच आहेत.

No comments