प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यावल शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य सहस्त्र लिंग दर्शन झाकीचे आयोजन भरत कोळी ...
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यावल शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य सहस्त्र लिंग दर्शन झाकीचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यावल शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तीन दिवसीय २५,२६,२७ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य सहस्त्र लिंग दर्शन झाकी बनवण्यात आली या झांकी मध्ये सहस्रलिंग दर्शन सोबतच अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ, सेल्फी पॉईंट, अध्यात्मिक चित्र प्रदर्शनी याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन २५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून.......... आले होते .आलेल्या पाहुण्यांचे स्वागत यावल सेवाकेंद्र संचलिका ब्रह्मकुमारी राजश्री दीदी यांनी केले. तसेच चिनावल सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी हिरा दिदी यांनी आलेल्या पाहुण्यांना शिवरात्रीचे महत्त्व समजावून सांगितले तसेच श्रद्धा दीदी यांनी विद्यालयाच्या कार्याचा परिचय दिला .आलेल्या पाहुण्यांचे हस्ते महाआरतीचे आयोजन केले त्यानंतर पाहुण्यांनी सहस्त्र ज्योतिर्लिंगाचे अवलोकन केले. त्यानंतर २६ तारीख महाशिवरात्री ला परमपिता परमात्मा शिव यांची जयंती म्हणून परमात्मा शिव यांचा झेंडा फडकवून तसेच केक कटिंग करून साजरी करण्यात आली त्यानंतर यावल सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांनी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सर्वांसमोर स्पष्ट केले. परमात्मा शिव यांना अर्पण करणारे फुल ,पान आणि फळ याचे रहस्य स्पष्ट केले आणि सहस्रलिंग दर्शनासाठी येणाऱ्या सर्व जनतेला निशुल्क राजयोग शिबिर करण्याचे आवाहन केले.
No comments