पाचोरा शहरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ पाचोऱ्यात शहरातील जामनेर रोडवरील पाटील ज्वेलर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले,सव्वा लाख रुप...
पाचोरा शहरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ
पाचोऱ्यात शहरातील जामनेर रोडवरील पाटील ज्वेलर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले,सव्वा लाख रुपयांचे दागिने घेवुन चोरटे पसार.
(जळगाव प्रतिनिधी शेख जावीद)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड ) पाचोरा शहरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असुन १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक ज्वेलर्सचे दुकान चोरट्यांनी फोडुन दुकानातील ३ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने घेऊन पसार झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील जामनेर रोडवर पाटील ज्वेलर्स या नावाने सोनाराचे दुकान आहे. दुकान मालक दिपक घाडगे हे १ फेब्रुवारी रोजी रात्री आपले दुकानाचे दैनंदिन काम आटोपून दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील चॅनल गेट हे कटरने कापुन शटरचे लाॅक तोडुन दुकानात प्रवेश केला. दुकानातील १ लाख २५ हजार रुपये किंमतीची चांदीची दागिने चोरुन घटनास्थळावरुन पसार झाले. सदरचा प्रकार २ फेब्रुवारी रोजी दिपक घाडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार, पो. हे. काॅ. राहुल शिंपी हे दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच घटनास्थळी जळगाव येथील श्वानपथक दाखल झाले होते. मात्र श्वास पथकास दिशा दाखविता आली नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
No comments