पिळोदा बुद्रुक येथील संदिप महाजन गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत प्रथम भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल त...
पिळोदा बुद्रुक येथील संदिप महाजन गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत प्रथम
भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते .
त्यामध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर १० वयोगटा मध्ये यावल तालुक्यातील पिळोदा बु. येथील हार्दिक संदीप महाजन याने प्रथम क्रमांक मिळवून त्याला गोल्ड मेडल मिळाले व पुढील दोन महिन्यानंतर थाइलंड येथे . रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे .
त्याच्या निवडीबद्दल अंतरराष्ट्रीय कोच भिकन अंबे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याच्या राष्ट्रीय स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांनी खुप मेहनत घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन व त्याला या यशस्वी शिखरा पर्यत पोहचविण्या साठी मोलाचा वाटा उचलला आहे त्या बद्दल सरांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले हार्दीक हा कष्ठकरी शेतकरी कुटुंबातील संदीप महाजन व कोमल महाजन यांचा मुलगा आहे
No comments