adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ओम शांती केंद्रात शिवध्वजपूजन करून महाशिवरात्री उत्साहपूर्ण वातावरणात साजरी...

  ओम शांती केंद्रात शिवध्वजपूजन करून महाशिवरात्री उत्साहपूर्ण वातावरणात साजरी... चोपडा प्रतिनिधी :  (संपादक-:- हेमकांत गायकवाड)         चोपड...

 ओम शांती केंद्रात शिवध्वजपूजन करून महाशिवरात्री उत्साहपूर्ण वातावरणात साजरी...


चोपडा प्रतिनिधी : 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

       चोपडा येथील  प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (ओम शांती केंद्र) मध्ये  महाशिवरात्री निमित्ताने शिवध्वजपूजन , ११,१०८ नारळांपासून तयार करण्यात आलेल्या शिवलिंग पूजन तसेच आरती करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

      यावेळी चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ  सुरेश बोरोले, माजी आमदार कैलास पाटील , विश्वनाथ अग्रवाल, राजेशभाई शर्मा, मनोज भाई कॉन्ट्रॅक्टर, सोनवणे साहेब ( एम एस इ बी ) , चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.


    सर्व प्रथम ११,१०८ नारळांपासून साकारण्यात आलेल्या शिवलिंग पूजन करण्यात आले. तद्नंतर शिवध्वज पूजन करून आरती करण्यात आली.

     यावेळी चोपडा  ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रम्हाकुमारी मंगला दीदीजी यांनी शिवरात्रीचे महत्त्व सांगताना सांगितले की.... शिव परमात्मा यांचे या धरतीवर दिव्य अवतरण झाले आहे .कलियुगाच्या अज्ञान अंधकराच्या रात्रीमध्ये येऊन ज्ञानाचा प्रकाश शिव परमात्मा देत आहेत.याचेच यादगार म्हणून त्यांची शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी आपण उपवास करतो .उपवासाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त ईश्वरचिंतन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. शिवलिंगावर जी त्रिपिंडी आहे त्याचे अध्यात्मिक रहस्य म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि शंकर या त्रि-देवतांचे शिव परमात्मा रचयिता आहेत म्हणून शिवलिंगावर त्रिपिंडी दाखवली जाते आणि शिवांना त्रिमूर्ती शिव असेही म्हटले जाते.

  चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, येथील शांती, स्वच्छता, पवित्रता मनाला खूप आनंद आणि समाधान देणारी आहे. जो  ईश्वरीय महावाक्य ऐकतो व ईश्वर चिंतन करतो. त्याला हमखास मनशांती मिळते. सर्वांनी नियमित ओम शांती केंद्रात येऊन राजयोगाचा व मनशांतीचा अभ्यास करावा असे आवाहन केले.

  ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी यांच्या मार्गदर्शनाने तेथील सारिका दीदी, करिश्मा दीदी व इतर दिदींनी तब्बल १५ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ११,१०८ नारळांपासून भव्य दिव्य असे शिवलिंग साकारले आहे. सदर शिवलिंगाचे दर्शन २६,२७ व २८ तीन दिवस सर्वांसाठी दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल दिदी  यांनी केले तर आभार राजू अण्णा यांनी मानले.

No comments