adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाळु तस्करांकडून महसुल पथकावर प्राणघातक हल्ला मुख्य दोन आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या

  वाळु तस्करांकडून महसुल पथकावर प्राणघातक हल्ला मुख्य दोन आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 वाळु तस्करांकडून महसुल पथकावर प्राणघातक हल्ला मुख्य दोन आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.११):-वाळु तस्करांकडून जेसीबीच्या सहाय्याने महसुल पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दाखल गुन्हयांतील मुख्य २ आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,संगमनेर तालुक्यात अवैध वाळु उत्खनन प्रतिबंध करण्याकरीता तहसीलदार धीरज मांजरे यांचे नेतृत्वाखाली महसुल विभागाचे पथक तयार करण्यात आले.दि.०९ फेब्रुवारी २०२५ रोजी महसुल पथक प्रवरा नदी पात्रात कनोली येथे अवैध वाळु कारवाई करण्यासाठी गेले असता विशाल आबाजी खेमकर व प्रविण शिवाजी गवारी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन जात होते.त्यावेळी त्यांच्या साथीदाराने अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जात असताना पथकाने पाठलाग केला असता जेसीबी ड्रायव्हरने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला.आरोपीतांच्या इतर ५ ते ६ साथीदारांनी महसुल पथकास आडवून कारवाई केली तर जीवे मारण्याची धमकी दिली.महसुल पथकाच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले.याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरनं 64/2025 बीएनएस कलम 109, 132, 189 (2), 191 (2), 303 (2), 352, 351 (2)(3), 351 (4), 221 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जिल्हा श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांना अवैध वाळु उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसुल विभागाचे पथकावर वाळु तस्करांकडून झालेल्या हल्ल्यांची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्हयांतील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.त्यानुषंगाने पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले,सागर ससाणे, अमृत आढाव,फुरकान शेख, मेघराज कोल्हे व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी पथक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयातील पाहिजे आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना गुन्हयातील आरोपी नामे विशाल हौसीराम खेमनर, रा.अंभोरे, ता.संगमनेर हा त्याचे साथीदारासह संगमनेर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली.पथकाने संगमनेर शहरामध्ये आरोपीचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) विशाल हौसीराम खेमनर, वय ३३, रा.अंभोरे, ता.संगमनेर २) सागर गोरक्षनाथ जगताप, रा.कनोली, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा ३) सोनु मोर पुर्ण नाव माहित नाही रा.डिग्रस, ता.संगमनेर ४) तुषार हौसीराम खेमनर, रा.अंभोरे, ता.संगमनेर ५) लखन मदने, रा.आश्वी, ता.संगमनेर ६) फिरोज शेख, रा.अंभोरे, ता.संगमनेर ७) ताहीर शेख, रा.अंभोरे, ता.संगमनेर अशांनी मिळून केल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील वाहन व मुद्देमालाबाबत उपयुक्त माहिती सांगीतली नाही. 

ताब्यातील वर नमूद दोन आरोपीतांना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 64/2025 या गुन्हयाचे तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments