स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई आरोपींकडून 12 गुन्ह्यांची कबुली 11 लाखाचे सोने हस्तगत सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमका...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई आरोपींकडून 12 गुन्ह्यांची कबुली 11 लाखाचे सोने हस्तगत
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर -चैन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून
12 गुन्हे उघडकीस आले असून 11 लाख 84,320/- रक्कमेचे 15 तोळे सोने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.20 मार्च रोजी फिर्यादी श्रीमती कुमारीदुर्गा रामप्रभु (वय 41,रा.कपीलेश्वर नगर,निलंग्रे, चेन्नई,तामीळनाडू) या शिर्डी येथे रस्त्याने पायी जात असताना यातील अज्ञात आरोपी हे मोटार सायकलवर येऊन त्यांनी फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन ओढून चैन स्नॅचिंग करून घेऊन गेले.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं 312/2025 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगच्या गुन्हयांचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास वर नमूद चैन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे सोमनाथ मधुकर चौभे व त्याचे साथीदारांनी केलेला असून ते शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.प्राप्त माहितीवरून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिर्डी परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) सोमनाथ मधुकर चौभे, वय 39, रा.अशोकनगर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर 2) अक्षय हिराचंद त्रिभुवन, वय 23, रा.लाडगाव चौफुली, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर 3) अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण, वय 36, रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर व 4) संतोष म्हसु मगर, वय 36, रा.बेलापूर रोड, गायकरवस्ती, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी सोमनाथ मधुकर चौभे याने काही दिवसापुर्वी अक्षय हिराचंद त्रिभुवन याचेसह मोटार सायकलवर शिर्डी येथे एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन ओढुन चोरी केली असून त्यावेळी चिंग्या गोडाजी चव्हाण व संतोष म्हसु मगर हे मोटार सायकलवर गुन्हा करण्यास मदत करत असल्याची माहिती सांगीतली.पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापासुन शिर्डी,संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळया ठिकाणी महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी केल्याचे सांगीतलेल्या माहितीवरून शिर्डी,तोफखाना, संगमनेर शहर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.ताब्यातील आरोपीकडे त्यांनी केलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण याने चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने हे सोनार महेश अरूणराव उदावंत, रा.गंगापूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर यास विकले असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष सोनार महेश अरूणराव उदावंत यांनी घेतलेल्या सोन्याची चैन वितळवून केलेली 5,53,840/- रू किं. 69.230 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हजर केल्याने तपासकामी जप्त करण्यात आली आहे.तसेच ताब्यातील आरोपी नामे सोमनाथ मधुकर चौभे याने गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागीने हे सोनार गुणवंत चंद्रकांत दाभाडे,रा.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर व काही दागीने हे सोनार विजय अशोक दाभाडे, रा.महालगाव, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर यास विकले असल्याची माहिती सांगून गुन्हयातील काही चोरी केलेले सोन्याचे दागीने हे त्याचे सासरी कोळपेवाडी ता.कोपरगाव येथे ठेवल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष सोनार विजय अशोक दाभाडे याने हजर केलेले व तसेच सोमनाथ मधुकर चौभे याने घरी ठेवलेले असे एकुण 5,50,480/- रू किंमतीचे 87.64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 80,000/- रू किंमतीची गुन्हयांत वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.आरोपी नामे सोमनाथ मधुकर चौभे हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 94/2024 भादंवि कलम 302, 376 या गुन्हयात हा फरार आहे.पथकाने तपासकामी वर नमूद आरोपीकडून 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण 11,04,320/- रूपये किंमतीचे 156.87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 80,000/- रू किंमतीची मोटार सायकल असा एकुण 11,84,320/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ताब्यातील आरोपीतांना शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 312/2025 या गुन्हयाचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे, फुरकान शेख,बाळासाहेब गुंजाळ,भगवान थोरात,सुनिल मालणकर,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments