adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची 7 मार्च रोजी गुणांकन यादी होणार प्रसिद्ध प्रकल्प अधिकारी अर्चना अटोळे यांची माहिती

  अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची 7 मार्च रोजी गुणांकन यादी होणार प्रसिद्ध प्रकल्प अधिकारी अर्चना अटोळे यांची माहिती भरत कोळी यावल प्रतिनिध...

 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची 7 मार्च रोजी गुणांकन यादी होणार प्रसिद्ध

प्रकल्प अधिकारी अर्चना अटोळे यांची माहिती

भरत कोळी यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प यावल या कार्यालयात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननी ची प्रक्रिया सुरु असून दिनांक 07 मार्च 25 या दिवशी अर्जदारांना किती गुण प्राप्त झाले यासंदर्भात प्राथमिक यादी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यावल येथे लावण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक रित्या बोलताना सांगितले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावल मार्फत सरळ भरती द्वारे शासनाच्या निर्णयानुसार  03 अंगणवाडी सेविका जागांसाठी 25 अर्ज आले होते तर 47 मदतनीसांसाठी 464 अर्ज प्राप्त झाले होते शासनाच्या नियमावलीनुसार इच्छुक अर्जदारांना शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसार त्यांना गुण देण्यात येत आहेत हे गुण शासनाने नियुक्त केलेल्या पडताळणी समितीतर्फे देण्यात येणार असून सदर समिती शासन निर्धारित असून शासन निर्णयानुसारच कामकाज करते...

या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस या जागांसाठी अर्जदारांनी कोणाच्याही अमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये आणि कोणी उलट सुलट माहिती देत असेल तर अशा माहिती ला  कुणी हि थारा देऊ नये उमेदवारांना मिळालेल्या गुणांकनानुसारच अर्जाची छाननी होणार असून कुणावर हि कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याची हमी. प्रकल्प अधिकारी यांनी दिलेली आहे.

प्राथमिक यादी 7 मार्च रोजी कार्यालयच्या बोर्डावर व पंचायत समितीच्या बोर्ड वर व रिक्त जागाच्या ग्रामपंचायतिच्या बोर्ड वर गुणांकन झालेली यादी प्रसिद्ध करण्यात येईल ज्यांना कोणाला या यादीमधील निवडीवर किंवा गुणांवर हरकत घ्यायची आहे त्यांनी दि. 07/03/2025 ते 21/03/2025 पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधावा 21/03/2025 नंतर आलेल्या हरकतीवर कुठल्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही... अंतिम यादी 24 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात येणार  असल्याचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावल तर्फे कळविण्यात आले.

संपूर्ण तालुका स्तरातून याची मोठी प्रसिद्धी झाली त्यामुळे एवढ्या इच्छुक अर्जदारांना प्रत्यक्ष अर्ज भरता आला आहे सदर भरती निपक्षपातीपणाने व विहित शासन निर्णयानुसारच होणार असल्याची ग्वाही  एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यावल श्रीमती -अर्चना आटोळे यांनी दिलेली आहे.

No comments