फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर बदली इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) गेल्या दीड...
फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर बदली
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
गेल्या दीड वर्षापासून कार्यरत असलेल्या फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची छत्रपती संभाजी नगर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती वर बदली करण्यात आली आहे शासनाच्या गृह विभागाने याबाबतीचे आदेश शुक्रवारी उशिरा काढले आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नपूर्णा सिंह या शिस्तीचा अवलंब करणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात यापूर्वी अन्नपूर्णा सिंह यांच्या सन 2020 च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर पोलीस उपविभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा डीवायएसपी पदी नियुक्ती झाली होती
तेव्हापासून त्या फैजपूर येथे डीवायएसपी पदाचा कार्यभार सांभाळत होत्या त्यांनी यावल रावेर तालुक्यात गुन्हेगारीवर चांगली वचक टाकली होती म्हणून त्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख राहिली त्याचबरोबर त्यांनी जातीय सलोखा निर्माण केले.

No comments