adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त किर्तनासह २०१ किलो महाप्रसाद वितरण

  करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त  किर्तनासह २०१ किलो महाप्रसाद वितरण  शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) करवंद नाका परिस...

 करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त  किर्तनासह २०१ किलो महाप्रसाद वितरण 


शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त  किर्तनासह २०१ किलो महाप्रसाद वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला 

सविस्तर वृत्त असे की शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त जनकल्याण सेवा भावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी  वार बुधवार रोजी सकाळी १० वा. कीर्तनासह २०१ किलो च्या महाप्रसादाचे वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता


सुरुवातीस भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराजांनी पंचपदी करत किर्तनकार ह.भ.प.मनोहर  खोंडे महाराज जळगावकर यांनी आपल्या मधुर वाणीतुन कीर्तनाद्वारे महाशिवरात्री निमित्त शिवपार्वतीची माहिती  सांगत गायन करत सर्व शिव भक्तांना मंत्रमुग्ध करुन घेतले या कीर्तनास उंटावद,वाघाडी,गिधाडे,करवंद, वनावल,विखरण,अंजदे,अर्थे भजनी मंडळी व  शिरपूर शहरातुन करवंद नाका भजनी मंडळींनी साथ दिली


तसेच संत सावता माळी हरिपाठ महिला मंडळ, भजनी मंडळ वरवाडे,जय दुर्गामाता महिला भजनी मंडळ गायत्री काॅलनी ,कुरखळी,खामखेडा, निमझरी, भटाणे,बाळदे,शिंगावे भजनी मंडळी व शिरपुर शहरातुन श्रीराम मंदीर,श्री खंडेराव मंदीर,श्री साईनाथ मंदीर माक्रेट यार्ड,भुपेश नगर तसेच करवंद नाका परिसरातील शिव भक्तगण कीर्तन श्रवणास उपस्थित होते

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे मा.सरपंच शिंगावे राजेंद्र पाटील, बालब्रम्हचारी,महंत सतिषदास भोंगे महाराज,भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज,श्री.गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर मराठे,विश्वस्त हिंम्मतबापु माळी,पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत,तालुका प्रमुख युवराज पाटील,विठ्ठल मंदिर संस्थान चे अध्यक्ष छगनबापु गुजर,सामाजिक कार्यकर्ते एम.के भामरे बापू ,महावैष्णव वारकरी मंडळ चे तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, नर्मदा परिक्रमवाशी विक्रम महाराज खामखेडेकर,भाजपा आध्यात्मिक संघटनेचे शहराध्यक्ष संतोष माळी,लौकी मा . सरपंच भीमसिंग राजपूत,नाभिक हितवर्धक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश सोनगडे, राष्ट्रीय जनसेवा पक्ष चे जिल्हा अध्यक्ष गोकुळ येशी, वारकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वास पाटील, तालुका प्रचारक विकास पाटील,श्री गुरुसेवा प्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष देवराम पाटील तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,खामखेडा पोलिस पाटील जगन्नाथ दिवरे,सुधाकर महाराज,शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळअध्यक्ष मनोहर महाराज,नाना गुरुजी,राजेंद्र मराठे,विठोबा महाराज,गोविंदाआप्पा मोरे,अमृत पाटील,लोटन पाटील उपस्थित होते


 कीर्तनानंतर सर्व प्रमुख अतिथींचे व  संत महंत व वारकरींचे प्रतिष्ठानातर्फे श्रीफळ फुल ,पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला तसेच सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.सरपंच राजेंद्र पाटील,प्रमोद भोंगे महाराज,संजय चव्हाण,संतोष माळी,जीवन चौधरी, पारसमल जेन,एच आर चौधरी सर यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले असून कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी केले होते


No comments