उंटावद येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा शब्बीर खान यावल प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गाय...
उंटावद येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा
शब्बीर खान यावल प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उंटावद येथे शुक्रवार दि.२८ पासून अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा ही साजरा करण्यात येत आहे या संकीर्तन सप्ताह दरम्यान
सकाळी ५ ते ६ काकडा आरती सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८:30 ते १०:30 हरीकिर्तन असा दैनंदीन
कार्यक्रम होणार असून यात दि.२८ रोजी ह.भ.प शशिकांत महाराज,भवरखेडा दि.१ रोजी ह.भ.प. देवगोपाल शास्त्री महाराज,आडगाव दि.2 रोजी ह.भ.प. कुणाल महाराज,भार्डु दि.३ रोजी ह.भ.प.सत्यवान महाराज,देवगाव दि.४ रोजी ह.भ.प.शुभम महाराज, मंदाने दि.५ रोजी ह.भ.प.नाना महाराज,दोंडाईचा दि.६ रोजी ह.भ.प.चंद्रकांत महाराज,अर्थे व दि.७ रोजी ह.भ.प.दत्तात्रय महाराज,देवळी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे या संकीर्तन सप्ताह दरम्यान गायनचार्य म्हणून हिलाल महाराज,करमाड योगेश महाराज,हनुमंत खेडे महेश महाराज,श्रीराम महाराज,सोनू महाराज,नरेश महाराज व सर्व माऊली भजनी मंडळ उंटावद व चिंचोली भजनी मंडळ तर मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प वैभव महाराज,चाळीसगाव व आशिष महाराज यांचे तर विणेकरी म्हणून ह.भ.प.स्वप्निल पवार यांचे सहकार्य लाभणार आहे तसेच शुक्रवार दि.७ रोजी महाप्रसाद व सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान दिंडी सोहळा होणार आहे तरी ४८ वर्षांची परंपरा असलेल्या या संकिर्तन सप्ताहाचा परीसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments