adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे येथे मोठ्या उत्साहात संगीतमय भव्य दिव्य तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह.

  चुंचाळे येथे मोठ्या उत्साहात संगीतमय भव्य दिव्य तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 चुंचाळे येथे मोठ्या उत्साहात संगीतमय भव्य दिव्य तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह.


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील चुंचाळे येथे मोठ्या उत्साहात संगीतमय भव्य दिव्य तुलसी रामायण व अखंड हरिनाम संकेतन सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता बुधवारी ५ मार्च रोजी होणार आहे. दैनंदिनी या ठिकाणी सजीव देखाव्यासह मोठ्या उत्साहात संगीतमय तुळशी रामायण सादर केले जात आहे. तर या सप्ताहाची सांगता ह भ प किसन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. व त्यादिवशी दिंडी सोहळा आणि महाप्रसाद देखील वितरण केले जाणार आहे.


चुंचाळे ता.यावल  येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भव्य दिव्य तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह आयोजित केले आहे. यात वक्ताश्री म्हणून हभप नामदेव महाराज दहिगावकर यांची उपस्थिती लाभली आहे. संपूर्ण सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांची याठिकाणी कीर्तन आयोजित आहे. संगीतमय तुळशी रामायण सादर करताना सजीव देखावे हे लक्षवेधी ठरत आहे. या सप्ताहाची सांगता बुधवारी ह भ प किसन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तत्पूर्वी दिंडी सोहळा, कलश यात्रा गावातून काढली जाणार आहे. तर समारोपाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसाद देखील वितरण केले जाणार आहे. येथे दैनंदिनी कार्यक्रमात पहाटे साडेपाच ते साडेसहा काकड आरती, सायंकाळी साडेपाच ते साडे सहा हरिपाठ, दुपारी एक ते साडे चार कथा आणि दररोज रात्री साडेआठ ते रात्री १०.३० या वेळेत कीर्तन या ठिकाणी चालत आहे. मोठ्या संख्येत दररोज येथे भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे

No comments