पक्षांसाठी विद्यार्थ्यांनी केली पाणी व अन्नाची तजवीज भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) येथील जळगाव जिल्हा मराठा वि...
पक्षांसाठी विद्यार्थ्यांनी केली पाणी व अन्नाची तजवीज
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांसाठी विद्यार्थ्यांनी अन्नाची व पाण्याची सोय केली.
उन्हाच्या तप्त झाडांनी नागरिकांची लाही लाही होत असताना छोट्या पक्षांच्या होणाऱ्या अवस्थेचा विचार केला तरी मन सुन्न होऊ शकते. अजूनही पक्षांना अन्न व पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उन्हाळ्याची चाहूल लागत असताना अन्नासाठी व पाण्यासाठी फिरणाऱ्या पक्षांसाठी अन्नाची व पाण्याची तजवीज केली. यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून पक्षांसाठी प्लास्टिकच्या बॉटलचा योग्य तो वापर करून पाण्याची सोय केली तसेच एकदल धान्य जसे बाजरी, ज्वारी, गहू, दादर आणून बर्ड फिडर मध्ये टाकून महाविद्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी असलेल्या झाडांवर, बॉटनिकल गार्डन तसेच महाविद्यालय आवारामध्ये ठेवून पक्षांसाठी भूतदया दाखवली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच. जी. भंगाळे, तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना डॉ. आर. डी. पवार,श्री अमृत पाटील प्रा. अश्विनी कोल्हे, प्रा रूपाली शिरसाठ, कु. नंदिनी महाजन, तृप्ती पाटील, हितेश्री महाजन यांनी सहकार्य केले.


No comments