शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे कोर्सेसचे मोफत फॉर्म भरून ३ दिवसीय कॅम्प यशस्वीपणे संपन्न वसई विरार प्रतिनिधी - मनिषा जाधव (संपादक -...
शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे कोर्सेसचे मोफत फॉर्म भरून ३ दिवसीय कॅम्प यशस्वीपणे संपन्न
वसई विरार प्रतिनिधी - मनिषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरार पश्चिम येथे दिनांक २६, २७ व २८ मार्च २०२५ रोजी विद्यार्थी, महिला व पुरुष यांच्या साठी सरकार तर्फे जे कोर्सेस मोफत दिले जाणार आहेत त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले.त्यात नर्सिंग, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, प्ले स्कूल टीचर, एसी मेकॅनिक व मोबाईल रिपेरिंग या कोर्सेस चा समावेश आहे. हा तीन दिवसीय कॅम्प बोळींज च्या भारतीय जनता पार्टी, विरार पश्चिम, च्या कार्यालयात घेण्यात आला.हा कॅम्प यशस्वी होण्या मागे संस्थेच्या पालघर जिल्हा सचिव/ समन्वयक वृषाली भावे आणि विरार शहर महिला अध्यक्ष प्रीती भातखंडे यांनी मोलाचे योगदान दिले असे मत शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अध्यक्ष खुशी कांबळे व सचिव मनीषा जाधव यांनी व्यक्त केले.
No comments