खरग विविध कार्यकारी सोसायटीची 100 टक्के वसुली जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार. चोपडा प्रतिनिधी :- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यात...
खरग विविध कार्यकारी सोसायटीची 100 टक्के वसुली
जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार.
चोपडा प्रतिनिधी :-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील खरग या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तालुका चोपडा जिल्हा जळगाव सोसायटीच्या शंभर टक्के पिक कर्जाची वसुली केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सचिन ईश्वर धनगर व व्हाईस चेअरमन रतिभान चिंतामण पाटील व सदस्यांचा सत्कार करण्यात आला असून खरग ही विविध कार्यकरी संस्था ही चांगल्या प्रकारे चालवून बँकेचे 100टक्के पीककर्ज वसूल करून दिल्याबद्दल बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक अजय देशमुख, शाखा व्यवस्थापक किशोर कदम बँक इन्स्पेक्टर के. पी.पाटील,सिनिअर अधिकारी सतीश पाटील सचिव साहेबराव पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेस मदत करणारे डॉ चंद्रकांत गोकुळ पाटील,कुंदन पाटील,मुक्तार शहा,शीतल हिरे,माधुरी पाटील,संजय पाटील,सचिन पाटील,घनश्याम पाटील,बाळू पाटील,तसेच संस्थेचे संचालक रमण पाटील व क्लर्क पंडित पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
No comments