adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मा.पोलीस निरीक्षक सो.. श्रीमती. कावेरी कमलाकर मॅडम यांना आदर्श गाव हातेड !!बु!!ग्रामस्थांच्या वतीने निवेदन

 मा.पोलीस निरीक्षक सो.. श्रीमती. कावेरी कमलाकर मॅडम यांना आदर्श गाव हातेड !!बु!!ग्रामस्थांच्या वतीने निवेदन  खलील तडवी बिडगाव /शामसुंदर सोनव...

 मा.पोलीस निरीक्षक सो.. श्रीमती. कावेरी कमलाकर मॅडम यांना आदर्श गाव हातेड !!बु!!ग्रामस्थांच्या वतीने निवेदन 


खलील तडवी बिडगाव /शामसुंदर सोनवणे हातेड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री श्रीमती. रक्षाताई खडसे यांची कन्या व तिच्या मैत्रिणी यांच्याबाबत घडलेल्या अनुचित प्रकाराबाबत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे बाबत  मा.पोलीस निरीक्षक सो.. श्रीमती. कावेरी कमलाकर मॅडम यांना आदर्श गाव हातेड !!बु!!ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले व सदरील घटनेचा निषेध केला 🏴🏴

आदर्शगाव  हातेड !!बु!! ग्रामस्थ यांच्या वतीने रावेर मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री श्रीमती. रक्षाताई खडसे यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी सोबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील यात्रौत्सवात गेल्या असता काही टवाळखोरानी त्यांची छेड काढली सदर घटना अतिशय संतापजनक व निंदनीय असून या घटनेच्या निषेधार्थ संबधित आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपींवरील खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यात यावा जेणेकरून अशा समाज घातकी विकृतींना आळा बसण्यास मदत होईल. म्हणून आदर्शगाव  हातेड !!बु!! ग्रामस्थ  व गावातील महिला तर्फे आपल्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन त्यांच्या पर्यंत पोहोचवावे व पुढील कार्यवाही व्हावी असे निवेदन देण्यात आले.

आदर्शगाव  हातेड !!बु!! सरपंच, उपसरपंच व संचालक मंडळ, वि.का.सो. चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक मंडळ,पि.क.स. चेअरमन.व्हा चेअरमन  व संचालक मंडळ, गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते

No comments