Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वामींच्या प्रकट दिनी मधु ताराचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

  स्वामींच्या प्रकट दिनी मधु ताराचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर. पुणे नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो (संपादक -:-हेमकांत गायकवाड ) दिनांक...

 स्वामींच्या प्रकट दिनी मधु ताराचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.


पुणे नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो

(संपादक -:-हेमकांत गायकवाड )

दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने मधु तारा प्रमुख नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले आहे. 

पुण्यातील मोहम्मदवादी हडपसर येथील सुप्रसिद्ध एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 स्वामी कृपे वरुन शिबिर आयोजक श्री स्वामी समर्थ सेवा परिवार मंदिर संस्थापक अध्यक्ष घनश्याम जगताप यांच्या मंदिरात हे शिबिर घेण्यात येत आहे.

हे शिबिर स्वामी समर्थ सेवा परिवार मंदिर साडेसतरानळी ग्रामपंचायत कार्यालया समोर घेण्यात येत आहे तरी या शिबिराचा लाभ हडपसर परिसरातील तसेच पुणे शहरातील नागरिकांनी घेऊन आपले नेत्र तपासणी करून घ्यावी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख अनिल दांगडे यांनी केले आहे.श्री स्वामी समर्थ

No comments