गुन्हेगारी प्रकरणांचा निर्णय घेण्यात फॉरेन्सिक पुराव्याचे महत्व जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नूतन मराठा महाविद्यालयात दिनांक...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नूतन मराठा महाविद्यालयात दिनांक 27 जानेवारी रोजी आय.क्यू ए.सी. विभागामार्फत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेत गुन्हेगारी प्रकरणांचा निर्णय घेताना फॉरेंसिक पुराव्याचे किती महत्त्व आहे या विषयावर गर्व्हर्मेंट लाॅ कॉलेज मुंबई येथील डॉ .नितीन देशमुख यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले सध्याचे युग सायबर गुन्हेगारीने त्रस्त झालेले आहे. बऱ्याच प्रकरणात पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटतात पण आता फॉरेन्सिक तपास यंत्रणा इतके विकसित झाली आहे की पायाच्या नखा पासून केसा पर्यंत तसेच रक्त नमुना, हाताचे ठसे, वेळ, काळ, शाईचा नमुना व कागदाचे वय यावरून आरोपी शोधता येतो.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्षांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल संदानशिव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बी.सी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. एस. पाटील पी. जी. समन्वयक डॉ. के. बी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. डी. आर. चव्हाण, डॉ. अविनाश बडगुजर प्रा. घनश्याम पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

No comments