adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी चोपडा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन व निदर्शने

  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी चोपडा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन व निदर्शने चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक ०३...

 शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी चोपडा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन व निदर्शने


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक ०३/०३/२०२५ वार सोमवार रोजी सकाळी ठीक १२ : ०० वाजता तहसील कार्यालय चोपडा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत अडीअडचणी संदर्भात शासनास निवेदन देण्यात आले,अँड.भैय्यासाहेबांनी आपल्या मनोगतातून सध्या देशात व राज्यात शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली असून शासनाप्रती जनसामान्यात व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश व संतापाची लाट असून शेतकरी संपूर्णतः हवालदिल झालेला आहे,


निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा सध्याचे शासनातील लोकांनी केलेली होती तिच्या चर्चेला अद्याप सुध्दा सुरुवात नाही ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला अजिबात हमीभाव नाही,शासन हमीभावाप्रमाणे खरेदी सुद्धा करीत नाही,तसेच उत्पन्नावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा शासनाची निष्फळ ठरलेली आहे एकंदरीत खतांचे,बी-बियाण्याचे,कीटकनाशकांचे मजुरीचे दर भरमसाठ वाढुन शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आलेली आहे तसेच खरीप २०२५ चा पिकविमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही हे सर्व जाणीवपूर्वक शासनाकडून होत आहे,यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश सिताराम पाटील शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी,किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे,शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट बाळकृष्ण सोनवणे,सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,अँड.एस.डी.पाटील,सुनिल बागुले,चोसाका संचालक शिवाजी अभिमन पाटील,शरद भागवत शंकर पाटील,सेेवादल अध्यक्ष योगिता चौधरी,विकासो चेअरमन संदीप देसले,मधुकर विठ्ठल पाटील,मोहन देवराम पाटील,सतीश कपूरचंद पाटील,नरेंद्र छगन पाटील,युवराज शालिग्राम पाटील,नितीन हिंमतराव पाटील,विजय दगाजी पाटील,शेख आरिफ शेख सिद्दिकी,शेतकरी संघटनेचे संदीप पाटील,जे.एच.पाटील,व्ही.एच.पाटील डॉ.शैलेश वाघ,डॉ.एस.आर.पाटील,भागवत सोनवणे,बबलू पटेल,शिरीष पाटील,जितेंद्र परदेशी,शिवदास सोनवणे,नवल धनगर,भरत सोनवणे,नरेंद्र शिंदे,लक्ष्मण पाटील,रविंद्र पाटील,भरत पाटील, शांताराम पाटील,भरत धनगर,सुनील नरहर पाटील,संदीप पाटील तावसे,किशोर रघुनाथ पाटील,महेंद्र शिरसाठ,देवकांत चौधरी,नवल भालेराव,शशिकांत चौधरी,इलियास पटेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments