पिंपळगाव लांडगा शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांची भेट शालेय कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अहिल्या...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२८):- मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांना प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. तसेच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा.शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे.त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांनी आज पिंपळगाव लांडगा येथील शाळेत भेटी दरम्यान केले व शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्तही केले.यावेळी केंद्रप्रमुख संजय धामणे,शाळेच्या
मुख्याध्यापिका आशालता निंबाजी पगारे,शिक्षिका सविता बाबासाहेब गोरे,दीपा चंद्रकांत
माव्हरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments