महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे हस्ते सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांचा सत्कार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमक...
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे हस्ते सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांचा सत्कार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चुडामण चौधरी यांनी नुकतीच पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. याबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे हस्ते विश्वनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आले. तसेच फैजपूर ग्रामस्थांनी सुद्धा वै.डीगंबरा महाराज चिनावलकर मनाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम रोझोदा येथे कामसिद्ध मंदिर सभागृहात सुरू असलेल्या गोपी गीत कथा महोत्सवात हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी कामसिद्ध मंदिर मंडळ अध्यक्ष विजय राघव महाजन, रमेश रामचंद्र महाजन, डॉ. मिलिंद वायकोळे, वसंत बोंडे, गुणवंत टोंगळे यांनी व फैजपूर चे अनिल नारखेडे, किरण चौधरी, राजेश महाजन, शेखर चौधरी, भूषण नारखेडे, गणेश पाटील, सि.के. चौधरी यांनी ही सत्कार केला. नर्मदा पायीपरिक्रमा करून मला जीवनातील खरे सुख व समाधान मिळाले. ते अनमोल असल्याची भावना सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांनी व्यक्त केली.
No comments