ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...
ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलाची शाळा०१ चोपडा येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक.०४/०३/२०२५ रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं.०१ चोपडा येथे गरजू विद्यार्थ्यांना फळ व बिस्किट वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला
सदर कार्यक्रम जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुनील इंगळे,उपशिक्षिका तृप्ती पाटील तसेच
विद्यार्थी सेजल वाला भरवाड,अमरसिंग कोमला बारेला,भावना वळू भरवाड,हेतळ वळु भारवाड,माथा वलू भरवाड,विद्यार्थी व विद्यार्थिनींना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जयराम कोळी, ऑल इंडिया ब्लू टायगर सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष हेमकांत गायकवाड, सदस्य चंद्रकांत पाटील उपस्थित होते.






No comments