निवासी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने शिवसप्ताह उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता. प्रतिनीधी संपादक हेमकांत गायकवाड किन...
निवासी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने शिवसप्ताह उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता. प्रतिनीधी
संपादक हेमकांत गायकवाड
किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने शिवसप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेला व छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पुजन व शिवगर्जना करण्यात आली.या कार्यक्रमांतर्गत शिवाजी महाराजांचा पूर्ण जीवनक्रम विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाटिका,नृत्य व मालिकेचा आधारे सादर केले यात इ.१ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रसंग देण्यात आले होते जसे की शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर शिवराज्याभिषेक पर्यंत विद्यार्थ्यांनी सादर केलेत
त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झुलवा पाळणा या गाण्याचा माध्यमातून सुरुवात करून शिवाजी महाराजांचा जीवनात आलेले प्रसंग जसे की पुरंदरचा तह,अफजलखानाचा वध,महाराजांची आग्रा येथून सुटका,स्वराज्यासाठी मावळ्यांनी घेतलेली शपथ व गड आला पण सिंह गेला अशा विविध नाटिकेचा नृत्याचा माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट गुण विद्यार्थी प्रेक्षकांसमोर सादर केले
या कार्यक्रमास स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ.पुनम मनिष पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव शिक्षक राजश्री अहिरराव, मिलिंद भालेराव,गोपाल चित्ते,सोनाली कासार, योगिता सावळे,हर्षल मोरे,प्रतिभा पाटील, मयुरी बारी,सचिन सोनवणे,ज्ञानेश्वर धनगर, रोहित बाविस्कर,वैशाली मराठे,देवयानी साळुंखे,रामकृष्ण पाटील,भावना चोपडे, प्रतिभा धनगर,पवनकुमार महाजन,ऐश्वर्या सोनार,योगिता बिहारी,तिलोत्तमा महाजन,माधुरी फालक, नूतन देशमुख,सोनाली वाणी,बाळासाहेब पाटील,निलेश महाजन, गोकुळ व शिक्षकेतर कर्मचारी इ.सह विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments