adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुलाचे संरक्षण कठडे बसवण्याचे काम पुर्ण झाल्याने परिसरासह वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान

  पुलाचे संरक्षण कठडे बसवण्याचे काम पुर्ण झाल्याने परिसरासह वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी:  (संपादक -:-हेमकांत...

 पुलाचे संरक्षण कठडे बसवण्याचे काम पुर्ण झाल्याने परिसरासह वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी: 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर किनगाव पासून चोपडा कडे जाताना किनगाव ग्रामीण रुग्णालयाशेजारी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या लव्हाळ नाल्यावरील पुलाच्या पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधण्यात आली नव्हती परंतु संरक्षण कठडे नसलेल्या जागी झाडे झुडपे वाढलेली होती या झाडांमुळे खाली खोल असलेल्या नाल्याची खोली दिसत नव्हती मात्र आता या लव्हाळ नाल्यावरील पुलाच्या आजूबाजूला संरक्षण कठडे नसलेल्या जागेवरील झाडे झुडपांची तोडणी केली असता आता हाभाग पुर्णपणे मोकळा झाला होता त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर किनगाव गावाजवळ लव्हाळ नाल्यावरील या पुलावरून दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते जवळच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती आहे त्यामुळे नेहमी या लव्हाळ नाल्यावरील पुलाच्या थोड्या अंतरावर वर्दळ सुरू असते.त्याच प्रमाणे ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर दररोज शेकडो केळीसह इतरही अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असते.लव्हाळ नाल्यावरील पुलाचे बांधकाम करताना पुलाचे कठडे तर होते पंरतु पुलाचे कठडे टाकताना पुलाचे पुढे व मागे दहा ते पंधरा फुटांपर्यंत संरक्षण कठडे सुरूवातीपासुनच बांधलेले नव्हते त्यामुळे जेथुन पुल प्रारंभ होतो तेथुन संरक्षण कठडे बांधकाम करणे जरूरीचे होते.पुलाचे अशा दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने गाडी खाली पंधरा ते वीस फूट खोल लव्हाळ नाल्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती वाहनचालक पुलाच्या कठडे नसलेल्या बाजुजवळुनच वाहने ने आण करीत होती.त्यामुळे वाहनचालकांचे थोडे ही वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहने थेट नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षितते करीता संरक्षण कठडे अजुन पुढे दहा फुटांपर्यंत बांधण्यात यावेत.अशी मागणी परीसरातुन व वाहन चालकांकडून करण्यात येत होती व याच गोष्टीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी तात्काळ संरक्षण कठडे बसवण्याची  व्यवस्था केली व पुलाला संरक्षण कठडे बसवण्याचे काम पुर्ण झाल्याने परिसरासह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले

No comments