"शेळगाव बॅरेजमुळे यंदा चोपडा तालुक्यातील १७ गावांना जलसंजीवनी" चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील खाल...
"शेळगाव बॅरेजमुळे यंदा चोपडा तालुक्यातील १७ गावांना जलसंजीवनी"
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील खालील गावांना याचा फायदा होणार आहे पुनगाव,मितावली,पिंप्री,वडगाव,वटार,सुटकार,खेडी,भोकरी,कोळंबा,सनफुले,कठोरा,कुरवेल,निमगव्हाण,तावसे,खाचणे या गावांच्या समावेश आहे.प्रकल्पातून पहिल्यांदा सुटणार आवर्तन जिल्ह्यातील चार तालुक्यांना होणार सिंचन लाभ चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नातून पाणीटंचाई निवाराणार्थ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार चंद्रकांत सोनवणे,आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली
असून जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच त्यातून आवर्तन सोडले जाणार आहे तरी यात चोपडा तालुक्यातील १७ गावांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मोठा दिलासा मिळणार आहे शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील १७ गावांना भर उन्हाळ्यात सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे त्यातून गावकऱ्यांना पाणी टंचाई संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे तसेच शेतकरी बांधवांना शेतामधील विहीरी व बोअरवेल च्या पाणी पातळीत वाढ होणार आहे
त्यातून शेतकरी बांधवांना ही मोठा फायदा होणार आहे.प्रशासनाने यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जलसंपदा विभागाची प्रभारी कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करीत असून सध्या तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाई होत असल्याकारणाने प्रशासनाला त्वरित पाणी सोडण्याचे निर्देश दिले.उपस्थितीत चोपडा तालुक्यातील -खालील गावांना याचा फायदा होणार आहे.पुनगाव,मितावली,पिंप्री,वडगाव वटार,सुटकार,खेडी भोकरी,कोळंबा,सनफुले,कठोरा,कुरवेल निमगव्हाण,तावसे,खाचणे या गावांच्या समावेश आहे.तसेच या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी गुळ मध्यम प्रकल्पाचे पाणी डावा व उजवा कालव्याद्वारे सोडण्यात यावे अशी सुचना दिली यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी यांनी लवकरच गुळ मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येईल असे सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे,पोलीस अधीक्षक अशोक नखाते,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



No comments