नूतन मराठा महाविद्यालयात ओळख भारतीय संविधानाची या विषयावर व्याख्यान संपन्न.. जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) नूतन मराठा महाविद...
नूतन मराठा महाविद्यालयात ओळख भारतीय संविधानाची या विषयावर व्याख्यान संपन्न..
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने डॉ राहुल संदानशिव यांचे "ओळख भारतीय संविधानाची" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ के बी पाटील होते तर आयोजक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ एन जे पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ आफाक शेख विचारमंचावर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ राहुल संदानशिव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात,
आम्ही भारताचे लोक अशी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून तयार करण्यात आलेल्या संविधानाची उद्देशिकाच भारतीय संविधानाचा आत्मा आहे असे सांगत भारताचा प्रत्येक नागरिक ताज नसलेला बेताज बादशहा आहे असे सांगून भारतीय संविधाना गौरव केला..
देशाच्या राजाचा जन्म राणीच्या पोटातून नाही तर जनतेने दिलेल्या मतातून व मतपेटीतून होणे तसेच राजाच्या मनमानी राजकारभाराला तिलांजली देऊन लोकप्रतिनिधींच्या इच्छेनुसार देशाचा कारभार होणे ही भारतीय संविधानाची एक विशेष उल्लेखनीय ओळख आहे असेही ते म्हणाले..
अध्यक्षीय मनोगतात डॉ के बी पाटील यांनी, भारतीय संविधानाचा जगात बोलबाला आहे आणि अशा संविधानाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे परंतु हा अभिमान नूसता बोलका नसावा तर तो संविधानाचा अभ्यास करून प्रत्यक्ष कृतीत आणला गेला पाहिजे असे आवाहन केले.. प्रास्ताविक डॉ एन जे पाटील यांनी , सुत्रसंचलन प्रा रत्नाकर कोळी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ आफाक शेख यांनी केले.. व्याख्यानास सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते



No comments