धारदार तलवार बाळगणारा मुट्ठी चौकात जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि....
धारदार तलवार बाळगणारा मुट्ठी चौकात जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८ ):- धारदार तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आहे.विशाल भारतसिंग परदेशी (रा.बालिकाश्रम रोड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की नगर सोलापूर रोडवर मुट्ठी चौकाचे जवळ सदरील इसम हा तलवार घेऊन येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार सपोनि.जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी सदरील इसमास धारदार तलवारीसह ताब्यात घेतले व त्याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 202/2025 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार दीपक शिंदे,रवींद्र टकले,संदीप घोडके,नंदकुमार पठारे,प्रमोद लहारे,कैलास शिरसाठ यांनी केली आहे.
No comments