Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातपुड्यातील अती दुर्गम भागाला मिळाला सुरक्षित मातृत्वाचा- आधार

  सातपुड्यातील अती दुर्गम  भागाला मिळाला सुरक्षित मातृत्वाचा- आधार  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) काल दि-२७/०३/२०२५ रोजी आमोश...

 सातपुड्यातील अती दुर्गम  भागाला मिळाला सुरक्षित मातृत्वाचा- आधार 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

काल दि-२७/०३/२०२५ रोजी आमोश्या पाडा या अतिदुर्ग भागात अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व Jpiego यांच्या सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रोजेक्ट च्या जनजागृती कार्यक्रमातून या भागात राहणाऱ्या इथल्या मूळ रहिवासी आदिवासी समुदायाला विशेषता माता आणि बाल आरोग्यासाठीच्या चांगल्या आरोग्य सुविधां तसेच योजनां संदर्भात माहिती तसेच उपाययोजना करण्यासाठी हा उपक्रम  गाव पातळीवर तसेच पाड्यांवर अशा जनजागृती कार्यक्रमातून राबविला जात आहे.यासाठी आपल्या चोपडा तालुक्याचे आरोग्य दूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर व आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील तसेच Jpiego च्या PO - आम्रपाली मुरार,दीपक संदनशिव,भगत सर  यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर,शाळांवर तसेच पाड्यांवर, वस्त्यांवर राबविले जात आहेत.या कार्यक्रमासाठी गावातील पटेल - आमोश्या पावरा दादा, गावातील सामाजिक कार्यकर्ते,दाई,तसेच सोबतच प्रोजेक्ट चे Counsellor- ज्ञानेश्वर सोनवणे व CN- सागर पावरा,शिवा बारेला,निशांत कोळी,लेनिन महाजन,प्रिती बारेला,योगिता सोनवणे यांची  उपस्थिती होती.सर्वप्रथम ज्ञानेश्वर सोनवणे  यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना मांडली

तदनंतर प्राथमिक स्वरूपात गावातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित बाळंतपणा संदर्भात माहिती देण्यात आली.यानंतर आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील यांनी आपल्या प्रकल्पाविषयी व सुरक्षित बाळंतपणासाठी प्रसूतीपूर्व तसेच बाळंतपणा दरम्यान महिलेची (ANC मातेची) घ्यावयाची काळजी व त्याबाबतचे उपयोजन याबद्दल  गावकर्‍यांना सविस्तर माहिती दिली. तसेच गर्भवती महिलेला सुरक्षित बाळंतपणासाठी मिळणाऱ्या सरकारच्या योजनाबाबतीत सविस्तर माहिती दिली.तद्नंतर शब्दसुमानाने सर्व गावकर्‍याचे आभार मानले व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.आम्रपाली शिक्षिका व भगत शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments