गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासह एक जण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:...
गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासह एक जण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१):- राहुरी येथे गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतुक करणारा आरोपी जेरबंद आरोपीकडून 7 लाख 20,000/- रू किं.मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे,सोमनाथ झांबरे, बाळासाहेब गुंजाळ,रमीजराजा आत्तार,विशाल तनपुरे अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले. दि.02 मार्च रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अहिल्यानगर ते मनमाड रोडवर, कृष्णा स्टील,जुने बसस्टॅण्ड राहुरी येथे एक इसम त्याच्या मालवाहु चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने डांबुन ठेवुन,वाहनामधुन वाहतुक करत आहे.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जुने बस स्टॅण्ड राहुरी येथे जाऊन संशयीत वाहनाचा शोध घेऊन, वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसल्याने संशयीत इसमास ताब्यात घेऊन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रियाज रज्जाक सय्यद,वय 25, रा.क्रांतीचौक,राहुरी, ता.राहुरी,जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष आरोपीचे टेम्पोमधील गोवंशीय जनावराबाबत विचारपूस केली असता त्याने गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेबाबत माहिती सांगीतली.पथकाने आरोपीकडून 1,20,000/- रू किं.त्या गोवंशीय जातीचे 3 गायी व 1 गोऱ्हा, 6,00,000/- रू किं.त्यात अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्र.एमएच-12-केपी-6688 असा एकुण 7,20,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यातील आरोपीविरूध्द राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 194/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ) सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments