साकळी येथील कु.ऋतुजा महाजनला कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) सुंदरबाई फाऊंडेशन,विरा फाऊंड...
साकळी येथील कु.ऋतुजा महाजनला कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
सुंदरबाई फाऊंडेशन,विरा फाऊंडेशन छ.संभाजीनगर,ओ जे अकॅडेमी व वुशु किंग ड्रॅगन मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मलकापूर येथे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये साकळी ता. यावल येथील कु. ऋतुजा मोहन महाजन हिला कराटे फाईट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. तिने अटीतटीच्या अंतिम लढती मध्ये छ. संभाजीनगर आणि मलकापूरच्या खेळाडूंना फाईट देत आपले सुवर्णपदक मिळवले. कु. ऋतुजावर साकळीसह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यापुर्वी ही तिला दोन कास्य व एक रौप्य पदक मिळाले आहे.ती इयत्ता ६ वी ची आर आर विद्यालय जळगाव येथील विद्यार्थिनी असुन ती शुभ कराटे क्लास जळगाव येथे कराटे प्रशिक्षण घेत आहे. यासाठी तिला प्रशिक्षक राजेश इंगळे सर आणि पूर्वा सोनवणे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शुभ क्लास ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून ३५ सुवर्ण व ४ रौप्य पदक मिळाले आहेत.याठिकाणी
प्रमूख पाहुणे डॉ.नितीन बराटे , डॉ. तेजस्वी पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष आश्विनी साठे पाटील, योगा टीचर प्रणाली खर्चे , ऍड. दिलीप बगाडे , प्रशिक्षक पंच अजय काशीद सर, राजेश इंगळे सर, आनंद मोरे सर, शीतल महाजन,पुर्वा सोनवणे, जोगिंदर मोर्य सर, गोपाल पाटील सर आदी उपस्थित होते अशी माहिती कु. ऋतुजाचे वडील मोहन प्रकाश महाजन यांनी दिली.

No comments