adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी कट्यासह तरुण जेरबंद तोफखाना पोलिसांची पंपिंग स्टेशन जवळ कारवाई

  गावठी कट्यासह तरुण जेरबंद तोफखाना पोलिसांची पंपिंग स्टेशन जवळ कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२७...

 गावठी कट्यासह तरुण जेरबंद तोफखाना पोलिसांची पंपिंग स्टेशन जवळ कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२७):-गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या इसमास जेरबंद करण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.27 मार्च रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,पपिंग स्टेशन रोड ते कराळे जिम जाणारे रोडवर एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम गावठी कट्टा स्वतःच्या कब्जात बाळगुन आहे.आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्यान पोलीस निरीक्षक श्री.कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंपिगस्टेशन रोड ते कराळे जिम रोड येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम दिसुन आल्याने त्यास घेराव घालून मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल मधुकर गायकवाड (रा. नालेगांव अहिल्यानगर) असे सांगितले.छाप्या दरम्यान सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक 40,000/-रु कि.चे गावठी बनावटीचे पिस्तुल व एक 500/- रु किंचे जिवंत काडतूस मिळून आले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग प्रभारी नगर शहर विभाग श्री.संपतराव भोसले,पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी.पाटील, पो.हे.कॉ.अहमद इनामदार, भानुदास खेडकर,वसिमखान पठाण,पो.कॉ सुमित गवळी यांनी केली आहे.

No comments