Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वतीने मान्यवरचा सत्कार

  चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वतीने मान्यवरचा सत्कार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)        चोपडा येथे दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑ...

 चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा वतीने मान्यवरचा सत्कार


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

       चोपडा येथे दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा चोपडा तालुका यांच्या वतीने चोपडा तालुक्यातील काही मान्यवरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते.यावेळी संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने एरंडोल येथे संविधान सन्मान परिषद  आयोजित करण्यात आली होती. तेथे जिल्हास्तरीय संविधान जनजागृती पुरस्कार 2025 चोपडा तालुक्यातील काही मान्यवरांना देण्यात आला ते पुढील प्रमाणे 

 तुकाराम नारायण बाविस्कर माजी सभापती,अशोक राजाराम बाविस्कर नगरसेवक,शालिग्राम व्यंकट करंदीकर माजी सैनिक तथा समता सैनिक दल प्रमुख , साहित्यिक राजेंद्र काशिनाथ पारे,तसेच भरत भीमराव शिरसाठ यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल,व भगवान भाऊलाल वारडे तथा छोटूभाऊ वारडे यांची व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल व सत्कारा बद्दल पुरस्कारार्थी यांनी मनोगत व्यक्त केले.

     सदर कार्यक्रमास सुदाम रामदास करणकाळ,रमेश गोबा सोनवणे,अशोक शिरसाट, देवानंद वाघ, रामचंद्र आखाडे, मिलिंद बाविस्कर आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव लक्ष्मण बाविस्कर यांनी केले व आभार रामचंद्र आखाडे सर यांनी मानले.

No comments