adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी आणि वारसविहीर शिवारामध्ये बांधण्यात आलेले मातीचे पाझर तलावाचे कामाचे अपूर्ण अवस्थेत

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी आणि वारसविहीर शिवारामध्ये बांधण्यात आलेले मातीचे पाझर तलावाचे कामाचे अपूर्ण अवस्थेत त्र्यंबकेश्वर प्...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी आणि वारसविहीर शिवारामध्ये बांधण्यात आलेले मातीचे पाझर तलावाचे कामाचे अपूर्ण अवस्थेत


त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहोळी तसेच वारसविहीर शिवारामध्ये नाल्यांवर बांधलेल्या २ मातीच्या पाझर तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत व निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी व ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे.. अशी मागणी करण्यात आलेली असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 


मॄद व जलसंधारण विभागाकडून मातीचे पाझर तलाव बांधल्यावर पाझर तलावाच्या दोन्ही बाजूने बांधाला आतून बाहेरून दगडी पिचण करावी लागते करण्याचे फायदे बांधाची स्थिरता,मातीचे रक्षण, जलप्रवाहाचा नियंत्रण, दीर्घकालीन टिकाऊपणा,घसरण रोखणे,यासाठी पाझर तलावाच्या बांधाच्या आतून बाहेरून दगडी पिचण केली जाते. असे न करता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहोळी व वारसविहीर शिवारामध्ये २ वर्षांपूर्वी कोट्यावधी  रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या २ मातीचे पाझर बांधण्यात आले आहेत  या तलावाला बांधाच्या दोन्ही बाजूने पिचन केलेली नाही त्यामुळे बांधावरची माती खचून चाललेली आहे


हे धरण केव्हाही फुटू शकतो आणि या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे यामध्ये बांधावर पूर्ण मुरूम टाकण्यात आलेला आहे त्यामुळे हे तलाव लिकीज झालेले आहेत या दोन्हीही पाझर तलावाची पहाणी करून  संबंधित कंत्रादारावरती कार्यवाही करण्यात यावी  जर कारवाई झाली नाही तर नाशिक येथे  मृद व जलसंधारण ऑफिस येथे भारतीय जनता पार्टी व गावातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची दक्षता घ्यावी. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी आणि वारसविहीर शिवारामध्ये बांधण्यात आलेले मातीचे पाझर तलावाचे कामाचे अपूर्ण अवस्थेत व तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे त्या संदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी झुरावत साहेब यांना निवेदन देण्यात आले संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे निवेदनाद्वारे पत्र दिले. सामाजिक कार्यकर्ते जयवंतभाऊ हागोटे, रामदास शिद पत्रकार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे 



No comments