adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गांधीनगर (गुजरात) येथील गिफ्ट (GIFT) सिटी येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...

  गांधीनगर (गुजरात) येथील गिफ्ट (GIFT) सिटी येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट... भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक ...

 गांधीनगर (गुजरात) येथील गिफ्ट (GIFT) सिटी येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (#GIFTCity)  या भारताच्या प्रमुख आर्थिक आणि तंत्रज्ञान हबला भेट देणे हा एक विलक्षणीय अनुभव असल्या बाबत  केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  यांनी व्यक्त केले.


जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित संकल्पना आणि व्यवसायपूरक वातावरण ही गिफ्ट सिटीचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत. आदरणीय  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी  यांनी कल्पना केलेल्या विकसित भारताच्या दिशेने वाटचालीसाठी अशा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शक्य आहेत.


प्रमुख आंतरराष्ट्रीय बँका, तंत्रज्ञान विकसित कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या सुविधा यामुळे GIFT City जगभरातून गुंतवणूक आकर्षित करत आहे. विमा, मालमत्ता व्यवस्थापन आणि नव्याने विकसित होणाऱ्या वित्तीय क्षेत्रांसाठीही हे एक उत्तम केंद्र ठरत आहे.या भेटी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  यांच्या सोबत माननीय खासदार श्री.हेमांग जोशीजी (वडोदरा) आणि GIFT City चे अधिकारी उपस्थित होते.

No comments