दुष्काळी अनुदान ,पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन नांदुरा प्रतिनिधी:- (संपादक-:- हेम...
दुष्काळी अनुदान ,पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन
नांदुरा प्रतिनिधी:-
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीने झाल्याने पिकांच्या अतोनात नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान १३६०० रु पंतप्रधान पिक विमा २०२४-२०२५, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अभय संतोषराव पाटील अध्यक्ष अंबिका फाउंडेशन, निलेश नारखेडे युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वामध्ये दि. २८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की दुष्काळी अनुदान १३६०० रु पंतप्रधान पिक विमा ०२४-२५ १००% शेतकऱ्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी व कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा. सोयाबीन कापूस भावफरक जाहीर करून हेक्टरी१५००० रु शेतकऱ्यांना देण्यात यावे . शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर किशोर जाधव नारायण खंडारे गोलू पाटील प्रशांत आढाव सुनील शालीकराम जवरे संतोष बेलोकार यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहे

No comments