पार्वती अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न,संचालक राहुल गायकवाड करणार खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार सचिन मोकळं अहिल्या...
पार्वती अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न,संचालक राहुल गायकवाड करणार खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील वाणी नगर कमानी शेजारी
पार्वती अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी नगरसेवक तथा उल्हासनगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप दशरथ गायकवाड,उद्योजक गोपी दिलीप गायकवाड,उद्योजक प्रवीण दिलीप गायकवाड, पार्वती उद्योग समूहाचे संचालक शिवाजी दशरथ गायकवाड, उद्योजक गोविंद शिवाजी गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब पवार,नगरसेवक निखिल वारे,नगरसेवक संपत बारस्कर,उद्योजक बाळासाहेब बारस्कर,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,नगरसेवक कुमारसिंह वाकळे,उद्योजक शिवाजीराव चव्हाण, नगरसेवक सागर बोरुडे,नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक सुनील त्रिंबके,उद्योजक संपतराव नलावडे,नगरसेवक महेश तवले,नगरसेवक अमोल गाडे,एकनाथ पवार सर,डॉ.नंदकुमार जगताप सर, चंद्रशेखर पठारे सर, उद्योजक संतोष वाणी, भैय्या जरे, नितीन बोठे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्वती अभ्यासिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मुलींना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त व आरामदायक बैठक व्यवस्था,अभ्यासासाठी पोषक वातावरण, स्वतंत्र लॉकर सुविधा, अभ्यासासाठी स्वतंत्र केबिन, RO पाण्याची सुविधा,एसी व नॉन एसी हॉल, 24 तास वीज, 24 तास सीसीटीव्ही कव्हरेज,मोफत वाय-फाय तसेच अभ्यासिके बरोबरच मुलींचे वस्तीगृह तसेच भव्य दिव्य असे भोजनालयाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती संचालक राहुल गायकवाड यांनी दिली.
No comments