Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध,

  सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध, जिल्हयातील सराईत गुन्हेगार,वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गु...

 सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध,

जिल्हयातील सराईत गुन्हेगार,वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या  हालचालींवर पोलिसांचे लक्ष 


अहिल्यानगर (सचिन मोकळं):-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील प्रतिबंधीत असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करणारा व सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आला आहे.आतिक गुलामहुसेन कुरेशी (वय 34 वर्षे श्रीगोंदा शहरातील खाटीक गल्ली,ता.जि. अहिल्यानगर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर  श्रीगोंदा  पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात त्याच्या साथीदारांसह प्रतिबंधीत असलेल्या जनावरांची कत्तल करुन विक्री करणे,घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे व दरोडा टाकणे,महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, बलात्कार करणे,मालमत्ता जबरीने घेणे व खुन करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीरा विरुध्दचे व गोवंश हत्या बंदीचे गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती.त्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशन तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार आतिक गुलाम हुसेन कुरेशी याचे समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या.त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री.प्रभाकर निकम श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी एम.पी.डी.ए.कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन श्री. विवेकानंद वाखारे,उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता.सदर प्रस्तावाची जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह मा.जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांना सादर केला होता.नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची जिल्हा दंडाधिकारी डॉ.श्री.पंकज आशिया यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता आरोपीस  स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर,स.फौ.रविंद्र पांडे,पोहेकॉ.सुरेश माळी,पोना. सोमनाथ झांबरे,पोकॉ.रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे, मनोज लातुरकर,अमोल कोतकर,चासफौ.महादेव भांड, यांनी केली आहे. 

अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार,वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत डॉ.श्री. पंकज आशिया,  जिल्हादंडाधिकारी,अहिल्यानगर व श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.

No comments