आदिवासी पेसा गावात वनपट्टेधारक शेतकऱ्यांना विहीर आणि वीज योजना उपलब्ध करून द्या जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रमोद बारेला उपसरपंच व आदिवासी सा...
आदिवासी पेसा गावात वनपट्टेधारक शेतकऱ्यांना विहीर आणि वीज योजना उपलब्ध करून द्या
जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रमोद बारेला उपसरपंच व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील आदिवासी पेसा क्षेत्र बाहुल असून अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन हक्कांचे मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा २०१२ अंतर्गत आदिवासीसाठी वनहक्क कायदा असून ते आपलं उदरनिर्वाह वनहक्क कायदा अंतर्गत मिळालेल्या वनजमिनिवर असून त्याठिकाणी ते जमीन करत आहे.परंतु आपली वन जमिनी चे बारमाही शेती इतर पिके घेण्यासाठी पाण्याची आणि विजेची तसेच शेतात जाण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असून अजून पर्यंत ते वंचित आहे.तसेच सद्या जळगांव जिल्हात आदिवासी महाराष्ट्र शासनाने १०० दिवसात करावयाचा कामाचा आराखडा विविध विभागांनी आदिवासी हितासाठी उपाय योजना राबविता असताना जिल्ह्यातील आदिवासी वनपट्टा शेतीकरी यांना क्षेत्र निहाय समूह,मसाला समूह व नगदी पीक घेण्यासाठी तसेच शेतजमीन कसण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आहे परंतु या सारखे नगदी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना पायाभूत सेवा सुविधा पाण्याचीं (विहीर / बोरवेल) आणि लाईट (वैयक्तिक (रोहित्र) व्यवस्था या सारख्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रथम पाण्याची लाईटची व रस्त्यांची व्यवस्था करणे गरजेचे असून आदिवासी विभागा मार्फत केंद्रीय सहायता योजने मध्ये किंवा बिरासमुंडा क्रांती योजने अंतर्गत विहिरी आणि विज वितरण विभाग अंतर्गत शेतकरी बळीराजा योजने मधून (विज) वयक्तिक विजेची वनपट्टेधारक शेतकऱ्यांची लाभ द्यावा.अशी आशयाचे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे याप्रसंगी,प्रमोद बारेला उप सरपंच,कर्जाणे,पिंटू पावरा जिल्हा वन हक्क समिती सदस्य,नामा पावरा,सामाजिक कार्यकर्ते,मेलाणे,राकेश बारेला,कमेश बारेला होते

No comments