वड्री पाडा रस्त्यावर अवैध सागवान जप्त वनविभागाचे कार्यवाही भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सहाय्यक वनसंरक्षक (प्र...
वड्री पाडा रस्त्यावर अवैध सागवान जप्त वनविभागाचे कार्यवाही
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल श्री.समाधान पाटील सो. यांचे कडील गुप्त बातमी वरून मा.वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक श्री.स्वप्नील फटांगरे यांचे आदेशान्वये गस्ती पथक राऊंड स्टाफ व यावल पुर्व,यावल पश्चिम स्टाफ,संरक्षण मजुरा सह शासकीय वाहनाने मोजे वड्री पाडा रस्त्याने गस्त करीत असताना नाल्या मध्ये बेवारस साग चोपट नग 20 लपवलेले दिसून आले,साग चोपट नग 20 0.420 घन मीटर,अंदाजे माल किमत. रु.5660/- जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि.केंद्र यावल येथे पावतीने जमा केले, गुन्हे प्रकरण प्र.री.क्र. 05/2025 वनपाल गस्ती पथक यांनी नोंदवीला असून पुढील तपास सुरू आहे.सदर कार्यवाही मा.श्री.जमीर शेख साहेब उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,व मा. श्री. सदगीर साहेब विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे ,मा.श्री.समाधान पाटील साहेब सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, मा.श्री.स्वप्निल फटांगरे साहेब गस्ती पथक, मा.सुनिल भिलावे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.कारवाई मध्ये खालील कर्मचारी सहभागी झाले.श्रीरमेश थोरात,श्री.बी.बी.गायकवाड,श्री.प्रकाश बारेला,श्रीमती.वर्षा बडगुजर, श्रीमती.सीमा भालेराव, श्री.अश्रफ तडवी,श्री. जितू सपकाळे,श्री. सचिन तडवी,श्री. अमोल पाटील,श्री.विलास बारी,श्री.सचिन चव्हाण,श्री.तडवी. इत्यादी... नोट :-सर्व नागरिकांना आवाहन करणायत येती कि कोणताही वन गुन्हा दिसून आल्यास स्थानिक वनाधिकारी यावल यांच्याशी किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा

No comments