बेकायदेशीर पणे घेतलेला वेतन सह प्रवास भत्ता चौकशी करुन वसुल करण्याची मागणी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांची मुख्य कार्...
बेकायदेशीर पणे घेतलेला वेतन सह प्रवास भत्ता चौकशी करुन वसुल करण्याची मागणी
माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांच्या कडे तक्रार दाखल.
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
जिल्ह्यातील ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी दैनंदिनी मासिक अहवाल ( रोजनिशी) पंचायत समितीत जमा न करताच बेकायदेशीरपणे घेत आहेत वेतनसह प्रवास भत्ता
बेकायदेशीर पणे घेतलेला वेतन सह प्रवास भत्ता ग्रामसेवकांकडुन चौकशी करुन वसुल करण्याची मागणी ,माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांच्या कडे तक्रार दाखल.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात नियुक्त असलेले ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी यांनी मासिक दैनंदिनी अहवाल (रोजनिशी) प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या आत पंचायत समितीत सादर करुन मंजुर करुन घेणे बंधनकारक असते. तरच त्यांना वेतनसह प्रवास भत्ता अदा केला जातो, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी माहिती अधिकारात जळगाव, अमळनेर, धरणगाव, चोपडा व जामनेर या पाच तालुक्यातील कार्यरत असलेले २९६ ग्रामसेवकांची मासिक दैनंदिनी अहवाल (रोजनिशी) संबंधि माहिती मिळवली तर धक्कादायक गोष्ट म्हणजे २९६ पैकी फक्त २० ग्रामसेकांनी फक्त १ते ६ महिन्याची मासिक दैनंदिनी अहवाल (रोजनिशी) पंचायत समितीत सादर केली आहे. हे सर्व ग्रामसेवक कामावर असल्याचा पुरावाच नसल्याने त्यांनी घेतलेला वेतनसह प्रवास भत्ता बेकायदेशीर असुन संबंधित ग्रामसेवकांकडुन वेतनसह प्रवास भत्ता चौकशी करुन वसुल करण्याची मागणी मुंख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगांव यांच्या कडे केली आहे.
विहित मुदतीत चौकशी न झाल्यास कायदेशीर सल्ला घेऊन, न्यायालयात सुध्दा दाद मागण्याची माहिती श्री चौधरी यांनी दिली.
No comments