Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिलेल्या पत्रावर कारवाईसाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी केली मागणी

दिलेल्या पत्रावर कारवाईसाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी...

दिलेल्या पत्रावर कारवाईसाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी केली मागणी 


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 भुसावळ -  येथील संतोषीमाता हॉल समोरील आरक्षीत गटाबाबत उच्च न्यालयाच्या निकालाबाबत तत्कालीन मुख्याधिकारी यांना सर्वोच्च न्यायालात जाण्याबाबत अ‍ॅड.देशमुख यांनी सुचविले होते. मात्र याबाबत मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे  अ‍ॅड. देशमुख यांनी दिलेल्या पत्रावर कारवाईसाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

येथील संतोषीमाता हॉल समोरील सर्वे नं. 67 मधील आरक्षीत 3697 चौ.मी. बगीचा तसेच आरक्षीत 1478 चौ.मी. जमीन सुतीकागृह या गटावर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात रिटपिटीशन नं. 4322/2021 याची सुनावणी सुरू होती. या दाखल खटल्याचा निकाल लागला असल्यामुळे नगरपालिकेचे उच्च न्यायालयातील वकिल अ‍ॅड.भाऊसाहेब देशमुख यांनी दि.1-6-2022 रोजीच्या पत्रान्वये तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना सुप्रिम कोर्टात जाण्यास सुचविले होते. त्यावर कारवाई विनाविलंब करण्यात यावी असे असतांना देखील तत्कालीन कर्मचारी, अधिकारी यांनी कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सदरील रिटपिटीशन सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात यावी. याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत महितीस्तव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

No comments