उन्हाळ्यात ताज्या उसाच्या रसाची लज्जत औरच थंडगार उसाला ग्राहकांची पंसती भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उन्हाची ...
उन्हाळ्यात ताज्या उसाच्या रसाची लज्जत औरच
थंडगार उसाला ग्राहकांची पंसती
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उन्हाची चाहूल लागताच थंड पेय, सरबत, ज्यूस व थंड पाणी पिण्याची इच्छा होते जर ही तहान भागवताना जर उसाचा रस तोही ताजा मिळत असेल तर थंडगार उसाचा रस घेतल्याशिवाय मन शांत होत नाही. अजून उसाचा रस प्यावा वाटतो. फिकट हिरव्या रंगाच्या गोड उसाच्या रसात लिंबू पिळून विक्री होत असल्याचे चित्र दिसत असून ताज्या उसाच्या रसाची लज्जत औरच म्हणत नागरिक त्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
रस्त्याच्च्या कडेला झाडाच्या सावलीत तर काही शेतकरी फक्त उन्हाळ्यातच रस विकताना दिसून येतात. रस्त्याच्या कडेला, झाडाच्या सावलीत घुंगरूचा आवाज कानी येताच ताज्या ऊसाच्या रसासाठी नागरिक सावलीत विसावा घेत थंडगार उसाच्या रसाचा आस्वाद घेत आहेत.
उसाच्या रसात थोडे मीठ व लिंबू पिळून पिल्यास त्याची चव औरच लागते. उसाचा ताजा रस फायदेशीरच असून याचे विविध प्रकारचे गुणकारी फायदे आहेतच. खास करून वर्षातील बाराही महिने उसाचा रस मिळतो. नोव्हेंबर दरम्यान साखर कारखान्याच्च्या गळीत हंगामास सुरुवात होऊन साधारण मार्च, एप्रिलपर्यंत ऊस गळीत हंगाम संपतो. त्यांनतर पट्टा पडल्याने साखर करखान्याची धुराडी बंद होतात. उरलेला ऊस शेतकरी ग्राहकांना रसवंती सुरू करून उसाचा ताजा रस पिण्यासाठी उपलब्ध करून देतात. तर काहीजण किलोवर मोळी करून विकतात. ताजा रस १५ ते २० रुपये ग्लास विकला जात आहे लिंबु, बर्फ, थोडे मीठ, पायनापल टाकुन चवीष्ट्र उसाचा रसाला चांगलीच मागणी वाढलेली असल्याने रसंवती जवळ गर्दी दिसून येते.

No comments