adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन स्मृती प्रित्यर्थ गझल नाईटचे यशस्वी आयोजन

  जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन स्मृती प्रित्यर्थ गझल नाईटचे यशस्वी आयोजन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:-  हेमकांत गायकवाड) द...

 जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन स्मृती प्रित्यर्थ गझल नाईटचे यशस्वी आयोजन


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक-:-  हेमकांत गायकवाड)

दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली डी एन कॉलेज हॉल फैजपूर तालुका यावल येथे गझल नाईटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डायमंड डिजिटल हब फैजपूर व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गझल नाईट चे आयोजन करण्यात आले होते यावेळी म.रा.उर्दू संघटनेचे विभागीय सचिव गौस खान सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच डायमंड स्कूलचे अध्यक्ष हाजी हारून सेठ यांच्या हस्ते गझल नाईट चे उद्घाटन करण्यात आले. गजल कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर वाघुळदे सर प्राचार्य डी.एन.काॅलेज फैजपूर, संजय चौधरी खिरोदा,  जावेद जनाब मारुळ, कृउबा संचालक सय्यद असगर, अययुब सर यावल,  अलीम शेख यावल ,  सय्यद असद सरपंच मारुळ , प्रसिद्ध कवी रईस फैजपूरी ,  जाकीर सर चिनावल, कालु मिस्त्री वाघोदा , म.रा. उर्दू शिक्षक संघटने चे जिल्हा कार्याध्यक्ष असलम खान , डाॅ.अमित कुलकर्णी , सिंगर गावंडे मॅडम, तबला वादक व सिंगर पंकज वानखेडे, सिंगर  किशोर लोखंडे,अजमल खासाब , अलीम शेख , वसीम सर फैजपूर  ,अख्तर सर सावदा, नुर सर , रईस मोती सर , सुप्रसिद्ध करिअर काॅनसिलर डॉक्टर एजाज सर जळगांव,पत्रकार पिंटु कुलकर्णी सावदा, पत्रकार जावेद काजी फैजपुर , योगेश पाटील सर bsnl,  व इतर मान्यवर उपस्थित होते. जगविख्यात तबलावादक स्वर्गीय उस्ताद झाकीर हुसेन यांच्या स्मृतीस प्रित्यर्थ गझल नाईट चे आयोजन करण्यात आले होते यावेळी रावेर ,यावल, मारूळ, न्हावी, फैजपूर, मोठे वाघोदे, सावदा, भुसावळ, जळगाव, इत्यादी ठिकाणाहून गझल प्रेमी गझल ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्राचे सुपरिचित  व सुप्रसिद्ध गजल सिंगर प्रोफेसर बाबा पाटील, डॉक्टर मनीषा व तबला वादक मास्टर गुरव यांनी सुरेली गझल मैफिल चे सादरीकरण केले .श्रोत्यांनी विविध गझल सादर करण्याची  फरमाईश करून गझल चे मनसोक्त आनंद घेतले.

अतिथिंचे  स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन  माननीय शाहिस्त हैदर व सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबाद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजवान खान , अहमद रजा, शोएब शेख व  अक्रम बिजली यांनी मेहनत घेतली

No comments