बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात मलकापूर येथे वंचितचे राष्ट्रपतींना निवेदन अमोल बावस्कर बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायक...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात मलकापूर येथे वंचितचे राष्ट्रपतींना निवेदन
अमोल बावस्कर बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून दि. 1 मार्च रोजी मलकापूर जी.बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना मलकापूर उपविंभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनामध्ये बुद्धगयातील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावी या ॲक्ट मुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने जगभरातील बौद्ध अनुयायामध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मियांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या मंजूर करण्यात येऊन जगभरातील व विदेशातील बौद्ध बांधवाच्या भावनेचा विचार व आदर करून तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे हि मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी वं.ब.आ.चे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे, जी.संघटक भाऊराव उमाळे, ता.नेते अजय सावळे, तथा भीमराव ससाणे, सतिष सावळे, देवेंद्र इंगळे, महादेव तायडे, सिद्धार्थ गुरचळ साहेब, वसंत इंगळे, कैलास बाविसाने, निलेश इंगळे, बाळकृष्ण सोनोने आदी उपस्थित होते

No comments