मनवेलच्या युवकांने ११० दिवसांत केली नर्मदा परिक्रमा ३हजार सहाशे किमी अंतर पायी वारी करून परतले. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : संपादक हेम...
मनवेलच्या युवकांने ११० दिवसांत केली नर्मदा परिक्रमा
३हजार सहाशे किमी अंतर पायी वारी करून परतले.
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
संपादक हेमकांत गायकवाड
येथील श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी भक्त चिंधु चंपालाल पाटील व अन्नपुर्णा चिधु पाटील यांनी अतिशय कठीण व विशेष धार्मिक महत्व असलेली नर्मदा मैय्या परिक्रमा ११० दिवसात ३ हजार सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालत पूर्ण केली. गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले.
सलग दोन वेळा नर्मदा मैय्या परिक्रमा या दाम्पत्यांनी केली असुन त्यांचे गावात आगमन होताच धुनीवाले दादाजी प्रवेशव्दारा पासुन गावातील विविध धार्मिक स्थळांचे पुजन करून स्वागत करण्यात आले.
लहानपणापासून भजन, कीर्तन, पारायण व वारीची आवड असलेल्या चिंधु चंपालाल पाटील व इतर धार्मिक वाऱ्या केल्या आहे. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर तेथूनच परिक्रमेबाबत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत तब्बल ११० दिवस शेती, जंगली श्वापदे असलेल्या घनदाट जंगल, उंच डोंगर दऱ्याखोऱ्यातून निसर्गरम्य परिसरात चालताना स्वतः शेतकरी असल्याने तेथील शेती पिकांची पाहणी करीत व ‘नर्मदे हर नर्मदे हर’चा जयघोष करीत दिवसा नर्मदा परिक्रमा, तर रात्री आश्रमात झोप घेऊन परिक्रमेच्या मार्गावरील आदरातिथ्याचा आनंद घेतला. साडेतीन महिने भक्तिभावाने खडतर समजली जाणारी परिक्रमा पूर्ण करून ते गावी परतले. ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढली. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यांच्या कठोर परिश्रमाच्या भक्तीचे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
"परिक्रमा प्रवासात कोरीव काम केलेले सुंदर मंदिरे, भव्यदिव्य आश्रम आहेत. परिक्रमा करण्याऱ्या भाविकांविषयी रस्त्यावरील लहान- थोर, गरीब- श्रीमंत अशा सर्वांकडून आदराची भावना दिसून आली .
No comments