adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून तेजस पाटील यांची निवड...

  इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून तेजस पाटील यांची निवड... भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी-  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) जळगांव जि...

 इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर सहयोगी सदस्य म्हणून तेजस पाटील यांची निवड...


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी- 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

जळगांव जिल्हा इंडीयन रेडक्रॉस सोसायटीवर 3 वर्षाच्या अंतरिम कालावधीसाठी निवडलेल्या 63 नवीन सहयोगी सदस्यांमध्ये स्व.कृषिमित्र हरिभाऊ जावळे मित्र परिवारातील सदस्य तथा यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती व शिरसाड ग्रामपंचायत सदस्य श्री तेजस धनंजय पाटील निवड झाली. नुकतेच जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते रेडक्रॉसचे सन्मानचिन्ह देऊन तेजस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी गनी जी मेनन, विनोद जी बियाणी, डॉ.प्रसन्न कुमार रेदासानी, घनश्याम जी महाजन, सुभाष जी सांखला, विजय जी पाटील, पुष्पाताई भंडारी, शांताबाई वाणी, डॉ नरेंद्र ठाकूर यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल तेजस पाटील यांचे रावेर यावल विधानसभेचे  आमदार अमोल  हरिभाऊ जावळे यांच्यासह तालुक्यातील सर्व नेते मंडळी व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले. रेडक्रॉस ही जगातील 187 देशांमध्ये 70 लाख स्वयंसेवकांच्या सहकार्याने अखंडपणे सेवा देणारी आतंरराष्ट्रीय संघटना आहे. सर हेनरी ड्यूनांन्ट यांनी या आंतरराष्ट्रीय मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोनातून संस्थेची स्थापना केली होती. भारतात दिल्ली येथे 1920 साली रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली. रेडक्रॉस दिल्ली राष्ट्रीय पातळीवर महामहीम राष्ट्रपती, राज्य पातळीवर महाराष्ट्रचे राज्यपाल, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या संस्थेला पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेवर जळगाव जिल्हा शाखेवर तेजस पाटील यांची सहयोगी सदस्य म्हणून निवड झाली आहे. या संस्थेमार्फत मार्फत गरजूंना 24 तास रक्तसेवा उपलब्ध असते. तसेच कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केंद्र, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ई सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना, पर्यावरण वृक्षारोपण संवर्धन असे अनेक उपक्रम  संस्थेमार्फत राबवत असतात.

No comments