आमदार अमोल जावळे यांची यावल एसटी डेपोला अचानक भेट भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर यावल मतदार संघातील विद्यमा...
आमदार अमोल जावळे यांची यावल एसटी डेपोला अचानक भेट
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर यावल मतदार संघातील विद्यमान आमदार अमोल जावळे यांनी यावल येथील एसटी डेपो मध्ये अचानक भेट दिली पुणे स्वारगेट येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी प्रत्यक्षात यावल एस् टी डेपोत जाऊन उपस्थित परवाशांची हितगुज साधुन यावेळेस त्यांनी प्रवाशांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या
यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा यावल शहरात कॉलेज शाळेमध्ये शिक्षणासाठी ये जा करत असतात त्यांच्याशी सुद्धा प्रत्यक्षात आ ,जावळे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या
काही रोड रोमिओ सुद्धा बस स्टॅन्ड परिसरामध्ये बिनधास्त वावरत असून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असला पाहिजे असे उपस्थित महिला व प्रवासी यांनी आमदार अमोल जावळे यांना कथन केले आमदार अमोल जावळे यांच्यासहित यावल डेपो मॅनेजर डी बी महाजन भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगडे भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश भेगडे
भाजपा शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी भूषण फेगडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments