चित्रकार सुनिल दाभाडे यांनी उभारले पुस्तकांची गुढी जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव येथील मानव सेवा विद्यालयातील...
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी उभारले पुस्तकांची गुढी
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक ,चित्रकार ,पर्यावरण मित्र सुनिल दाभाडे यांनी पुस्तकाची गुढी उभारूनअनोख्या पद्धतीने गुढीपाडवा हा साजरा सण करण्यात आले.सुनिल दाभाडे यांनी पुस्तकाचे गुढी उभारण्यात अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा केला आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्व पटावे यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम घेतला आहे.सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फोन आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून पुस्तकाचा संबंधच नष्ट झालेल्या आपल्या पाहण्यास मिळतोय याच अनुषंगाने चित्रकार सुनिल दाभाडे गेल्या दोन-तीन वर्षापासून अनोख्या पद्धतीने पुस्तकाचे गुढी उभारून पुस्तकाचे महत्व नेहमी सांगत असतात .
या पुस्तकाच्या गुढीमध्ये महाराष्ट्रातील थोर चित्रकार ,शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, विचारवंतांनी लिहिलेली आत्मचरित्र ग्रंथ वेगवेगळे कलेची पुस्तके ,बोलकी चित्र ,गोष्टी ,कविता, भारतीय संविधान, शिवाजी महाराज,संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ,माता रमाई, लोकमान्य टिळक, पोट्रेट पीएम्स, जनरल नॉलेज , देव माणसं अन् गुणी लेकर ,श्यामची आई, भारतीय चित्रकार आणि ज्योतिष ग्रहयोग, थोर शास्त्रज्ञ, आरोग्य विषयी मार्गदर्शन इत्यादी पुस्तकांचा समावेश करून ही गुढी उभारण्यात आली आहे. यापुढे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल आपुलकी वाचनाचा लढा लागावा या उद्देशाने कलाशिक्षक सुनिल दाभाडे पुस्तकांची गुढी उभारण्यात आली आहे असे सांगितले सर्वांनी अनोख्या पुस्तकाच्या गुढीचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा सुनिल दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.
No comments