नाकाबंदी दरम्यान गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कोतवाली पोलिसा...
नाकाबंदी दरम्यान गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोतवाली पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास वाहनासह पकडुन २ लाख ४९,०००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि २७ मार्च रोजी रात्रीचे सुमारास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अहिल्यानगर शहरामध्ये एक पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीमध्ये एक इसम हा गावठी कट्टा व सोबत जिवंत काडतुस स्वतः जवळ बाळगुन शहरामध्ये फिरत आहे व तसे त्याच्या मोबाईलवरचे स्क्रिनवर हातात गावठी कट्टा घेवुन फोटो आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांनी तात्काळ इंम्पिरिअल चौक येथे नाकाबंदी कामी असलेले पोसई.गणेश देशमुख यांना तात्काळ सदर बातमीतील चारचाकी वाहनाचा नाकाबंदी लावुन शोध घेवुन कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिल्याने दि.२८ मार्च रोजी मध्यरात्रीचे सुमारास एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडी ही संग्राम वाईन्स कडुन इंम्पिरीअल चौक या दिशेने येताना दिसली असता पोसई/ गणेश देशमुख व सोबत पोलीस अंमलदार यांनी सदर गाडी ही नाकाबंदी दरम्यान अडवुन सदर इसमास नाकाबंदीचे उद्देश सांगुन त्याची झडती घेतली असता बातमीतील माहिती नुसार गावठी कट्टा हातात घेवुन फोटो त्याचे मोबाईलचे स्क्रिनवर दिसला. त्यावेळी पोसई.देशमुख यांनी पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेचे मागील बाजुस पॅन्टला खोसलेला एक गावठी कट्टा मॅगझीन असलेला व शर्टच्या वरच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय अण्णासाहेब कोबरणे (रा.गायके मळा केडगांव अहिल्यानगर)असे सांगितले. त्यावरुन त्याचेवर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं २८२/२०२५ शस्त्र अधिनियम १९४९ चे ३/२५ प्रमाणे पोकॉ/२४७० अमोल गाढे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई. गणेश देशमुख हे करत आहेत
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपत भोसले, पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. गणेश देशमुख,पोहेकॉ.योगेश भिंगारदिवे,पोहेकॉ.सलिम शेख, पोकॉ.अमोल गाढे,पोकॉ.अतुल काजळे,पोकॉ.अभय कदम, सतिश शिंदे,पोकॉ.संकेत धिवर, अनुप झाडबुके,पोकॉ.महेश पवार व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.
No comments