adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्हसावद थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता संदेश पथनाट्याद्वारे जनजागृती

  म्हसावद थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता संदेश पथनाट्याद्वारे जनजागृती    जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमक...

 म्हसावद थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता संदेश पथनाट्याद्वारे जनजागृती 


  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली  स्वच्छता संदेशावर आधारित पथनाट्याद्वारे "आपले म्हसावद- सुंदर म्हसावद -स्वच्छ म्हसावद" हा नारा देत स्वच्छता विषयी जनजागृती करण्यात आली.

      गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ उपक्रमांतर्गत शाळेने स्वच्छता संदेशावर आधारित प्रभात फेरी काढून पथनाट्याचे शाळा आणि गावातील विविध चौकांमध्ये सादरीकरण करून वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता राखण्याचे नागरिकांना आवाहन केले.यामध्ये नागरिकांनी आपल्या घरातील आणि परिसरातील कचऱ्याचे विकेंद्रीकरण करणे,त्यासोबतच गुटखा तंबाखूचे सेवन टाळून कुठेही थुंकून घाण करू नये,प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा,जेणेकरून घर परिसर आणि गाव स्वच्छ राहून रोगराईचे आजार होणार नाहीत आणि आपण रोगमुक्त आणि आनंदी जीवन जगू शकू असा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला.पथनाट्यातील विद्यार्थ्यांना कला शिक्षक वाय.एन.शिंदे यांनी मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी म्हसावद गावाचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,गावातील नागरिक बंधू-भगिनी,मुख्याध्यापक पी डी चौधरी,उप मुख्याध्यापक बच्छाव,पर्यवेक्षक के पी पाटील,शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हान,एस सी बाविस्कर,एस जे पवार,वाय एन शिंदे,श्री गिरासे,संगीता पाटील,शिक्षकेतर कर्मचारी सोपान श्रावणे,तुषार पाटील आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments